ताज्या बातम्या

स्वस्तात मस्त! ई-वॉटर टॅक्सीतून आता सागरी सफर

E-Water Taxi : सामान्य प्रवाशांना केवळ इतक्या रुपयांत जलमार्गे गाठता येणार मुंबई

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीवर (Traffic Jam) मात करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईलगतच्या शहरांसाठी हायस्पीड वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवा सुरू केली. मात्र, या सेवेचे भाडे खिशाला परवडत नसल्यामुळे प्रवाशांनी वॉटर टॅक्सीकडे पाठ फिरवली आहे. परंतु, लवकरच हा प्रवास खिशाला परवडणारा, सुखकर आणि पर्यावरणपूरकही होणार आहे. पावसाळ्यानंतर मुंबईत इलेक्ट्रीक वॉटर टॅक्सी (E-Water Taxi) सेवेत आणण्याचे नियोजन आहे. या सेवेमुळे सामान्य प्रवाशांना केवळ १०० ते १५० रुपयांत जलमार्गे मुंबई गाठता येईल.

मुंबई गाठण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स सेवा सुरू केल्या. मात्र पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या या वॉटर टॅक्सीचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मध्यंतरी सागरी महामंडळाने तिकीट दरात २० ते ३० टक्के कपात केली. तरीही भाडे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत होते. हा प्रवास स्वस्त होण्यासाठी सागरी महामंडळाने नॉर्वेच्या एका कंपनीसोबत चर्चा केली असून काही महिन्यांत मुंबईत इलेक्ट्रीक टॅक्सी सेवा सुरू होईल. त्यामुळे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, अशी माहिती सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, भारतातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबईत सुरू होणार असल्याचे ढोल प्रशासनाकडून जोरदार बडवले गेले होते. आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असल्याचा निर्वाळाही दिला गेला. वॉटरटॅक्सी सेवेत 12 आसनी आणि 56 आसनी अशा विविध प्रकारच्या वॉटर टॅक्सी सुरू केल्या. त्यात सर्वात कमी तिकीट दर हे 56 आसनी वॉटर टॅक्सीचे आहेत. बेलापूर ते भाऊचा धक्का हा प्रवास 50 मिनिटांत पार करणाऱ्या 56 आसनी वॉटर टॅक्सीसाठी अवघे २९० रुपये तर बेलापूर ते भाऊचा धक्का असा स्पीड बोटीने अवघ्या 30 मिनिटांच्या प्रवास करण्यासाठी 825 ते 1200 रुपये (एकेरी) मोजावे लागत होते. परंतु, प्रवाशांचा वेळ वाचणारा असला तरी दररोजचा खर्च परवडणारा नाही, असा सूर प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news