ताज्या बातम्या

मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीच्या मुहूर्तावर 5G होणार लॉन्च

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीच्या सर्वसाधारण सभेत घोषणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 45वी सर्वसाधारण सभा आज मुंबईत झाली. या सभेत चेअरमन मुकेश अंबानी यांनी दोन महिन्यांत रिलायन्स 5G नेटवर्क लॉन्च करत असल्याची घोषणा केली आहे. ऐन दिवाळीत 5G ची सुरुवात देशात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुकेश अंबानी म्हणाले की, ब्रॉडबँडचा वेग पूर्वीपेक्षा अधिक असेल. कमी किमतीत 5G ब्रॉडबँड सेवा दिली जाईल. यासोबत कनेक्टेड सॉल्यूशनही दिले जाणार आहेत. याद्वारे 100 दशलक्ष घरे जोडली जाऊ शकतात, असे त्यांनी म्हंटले आहे.

हे जगातील सर्वात प्रगत 5G तंत्रज्ञान असेल. हे एसए तंत्रज्ञानावर आधारित आहे. कंपनी लेटेस्ट व्हर्जन 5G सेवा आणणार आहे. इतर कंपन्या जुन्या सोल्यूशनचा वापर करून 5G लाँच करेल. तर जिओ स्टँडअलोन 5G सेवा वापरेल, असे कंपनीने सांगितले आहे.

या 5G नेटवर्कसाठी कंपनी 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. जिओ 5G दिवाळीच्या मुहूर्तावर लॉन्च होईल. ही सेवा सर्वप्रथम मेट्रो शहरात सुरू होणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत कंपनी प्रत्येक शहरात जिओ 5G लाँच करेल. कंपनी तिची वायर आणि वायरलेस सर्विस वापरून देशभरात 5G सेवा तैनात करेल.

कंपनी खाजगी उद्योगांसाठी खाजगी नेटवर्क सेवा देखील प्रदान करणार आहे. जिओची 5G सेवा रोलआउट योजना जगातील सर्वात वेगवान आहे. यावेळी आकाश अंबानी म्हणाले की, जिओची 5G सेवा गेमिंगपासून व्हिडिओ स्ट्रीमिंगपर्यंतचा सर्वच बदलेल.

WiMax प्रमाणे, JioAirFiber तेथे असेल. हे वैयक्तिक हॉटस्पॉट म्हणून काम करेल. याद्वारे वापरकर्ते 5G ब्रॉडबँड सेवा वापरू शकतील. Jio Airfiber सह, तुम्ही IPL सामने इंटरअॅक्टिव्ह पद्धतीने पाहू शकाल. तुम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या कॅमेरा अँगल थेट लाईव्ह पाहू शकाल. यूजर्स स्वतः कॅमेरा अँगल निवडण्यास सक्षम असतील. खर्‍या सामन्यापेक्षा हा अधिक मजेशीर असेल असे कंपनीने म्हटले आहे

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का