ताज्या बातम्या

Defence Deal: भारत, अमेरिकेसोबतच्या करारासाठी DACकडून प्रस्ताव मंजूर; शत्रूची झोप उडवणारं घातक ड्रोन करणार खरेदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर (MQ-9B Reaper) ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Defence Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर (MQ-9B Reaper) ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये भेटणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर ड्रोन खरेदी करण्यासंदर्भातील कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी 'सी गार्डियन' प्रकार खरेदी करण्यात आला आहे.MQ-9B रीपर्स ड्रोनचे दोन प्रकार आहेत, जे स्काय गार्डियन आणि सी गार्डियन म्हणून ओळखले जातात. केवळ सर्विलियन्स नाही तर अटॅक करण्यासाठीही या ड्रोनचा वापर करता येतो. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 35 तास हे ड्रोन वापरता येऊ शकतं.

सॅटेलाईटनं ऑपरेट करता येणारं हे ड्रोन 45 हजार फूट उंच उडू शकतं. हे ड्रोन सागरी देखरेखीसाठी वापरले जाऊ शकतात, तसेच पाणबुडीविरोधी युद्धासह विविध भूमिका बजावू शकतात. डीएसीच्या बैठकीत ड्रोन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ मुंबईत धडाडणार

Diwali 20224 : दिवाळीत कोणत्या तेलाचा दिवा लावावा? होतील अनेक शुभ काम

सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Harshvardhan Patil : मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल

Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?