एमपीएससीच्या विद्यार्थी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करावी.
तसेच अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा.नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रवार आधारित आहे. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे.
यावर आता आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलनात धक्कादायक माहिती दिली आहे. आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या नवा अभ्यासक्रम 2025 मध्ये लागू करण्याच्या पत्रावर सचिवांची सही नाही. अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.