पुण्यातील मोदी बागेत खासदार सुनेत्रा पवार दाखल झाल्या होत्या. काल छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आज सुनेत्रा पवार पुण्यातील मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली. यावर आता चर्चा सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, मला या विषयावरती काही माहिती नाही. एकतर महाराष्ट्रामध्ये काही घडत नाही. महाराष्ट्रामध्ये एकच घडणार आहे की, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरे जाणार.
यासोबतच ते म्हणाले की, राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येणार आहे. हेच महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. कौटुंबिक भेट असेल तर मला माहित नाही. माझी बैठक संपल्यानंतर मी वहिनींशी बोलेन किंवा दादांनासुद्धा विचारेन. कदाचित कौटुंबिक भेट असू शकते. असे सुनील तटकरे म्हणाले.