राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अजून एक नवी माहिती समोर येत आहे ती म्हणजे कोल्हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. संध्याकाळपर्यंत अमोल कोल्हे पवारांना भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल शपथ विधीला अजित पवारांसोबत खासदार कोल्हे उपस्थित होते. मात्र आता ते परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.