Well Team Lokshahi
ताज्या बातम्या

आईला वाचवायला गेली मुलगी अन् दोघीही बुडाल्या; इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना

या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Published by : Sudhir Kakde

इगतपुरी : तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात नगर भागातील मेंढपाळ आज मेंढ्यांना पाणी पाहण्यासाठी काठोकाठ भरलेल्या विहिरीवर गेले असता, मोनिका राजेंद्र गोयकर वय 15 ही पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी तिची आई पपाबई राजेंद्र गोयकार (वय 35) ही गेली असता, ती सुद्धा विहीरीत पडली आणि दुर्दैवाने दोघीही पाण्यात बुडाल्या. यामध्ये दोघी माय लेकीचा मृत्यू झाला. इगतपुरीच्या (Igatpuri) पिंपळगाव डुकरा गावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सदर मेंढपाळ हे रा. ताजु ता. कर्जत जि.अहमदनगर येथून या भागात मेंढ्या चरण्यासाठी आले आहेत. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी माय ,लेक,व मुलगा हे तिघे मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. मोनिका गोयकर हीचा पाय घसरला गेल्याने ती विहिरीत पडली ,अन् बुडू लागल्याने जवळच उभ्या असलेल्या आई पपाबई गोयकर हिने तिला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना ती ही पाण्यात बुडाली.त्या बुडल्याचे लक्षात येताच त्यांच्या लहान मुलाने आरडाओरडा करत गावातील काही लोकांना सांगितले.

त्यांनी घडणेचे गाभी ऱ्य ओळखून वाडिवाऱ्हे पोलिसांना कळविले पोलीस स्टेशन चे आधिकारी घटना स्थळी हजर झाले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी बेलु येथील जीवन रक्षक तुपे यांना बोलवून माय लेकीचा मृत्यू देह विहिरी बाहेर काढलन्यात आला.असून उत्तरणीय तपासणीसाठी घोटी येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा