मान्सूनचा प्रवास कुठेतरी थांबला आहे. मात्र दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी वारे वाहायला सुरुवात केली आहे. तसेच राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra)
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.