Monkeypox Case | Monkeypox Virus | Monkeypox  team lokshahi
ताज्या बातम्या

मंकीपॉक्समुळे देशात पहिला मृत्यू; 20 जण क्वारंटाईन

भारतात येण्यापूर्वी मंकीपॉक्सची लक्षण

Published by : Team Lokshahi

monkeypox death : केरळमधील त्रिशूरमध्ये मंकीपॉक्सच्या संशयित तरुणाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक तथ्य समोर आले आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा तपास अहवाल समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसची लक्षण असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. (monkeypox first death in india virus found in second report of kerala boy)

खरं तर, शनिवारी केरळमधील त्रिशूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली असून तो नुकताच संयुक्त अरब अमिरातीचा प्रवास करून भारतात परतला होता.

भारतात येण्यापूर्वी मंकीपॉक्सची लक्षण

भारतात येण्यापूर्वी या तरुणाचे यूएईमध्ये स्क्रीनिंग करण्यात आले. त्याला मंकीपॉक्स झाल्याची माहिती होती. हा तरुण 22 जुलै रोजी भारतात आला होता. 27 जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी यूएईमध्ये केलेल्या तपासणीचा अहवाल हॉस्पिटलमध्ये सादर केला, त्यानंतर विभागाला धक्का बसला. यानंतर पुन्हा तरुणाचे नमुने घेण्यात आले.

उशिरा रुग्णालयात दाखल

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 21 जुलै रोजी युएईहून परतल्यानंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यामागचे कारण काय होते याचा तपास केला जाईल.

20 लोकांना क्वारंटाईन केले

शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीच्या सदस्या रेंजिनी यांनी सांगितले की, मृत व्यक्ती कुटुंबातील सदस्य आणि काही मित्रांसह 10 लोकांच्या थेट संपर्कात होती. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून घाबरण्याचे काहीही नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, पुण्णूर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मंकीपॉक्सची लागण झालेल्या युवकाच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

ही लक्षणे आहेत

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मंकीपॉक्सची लक्षणे 6 ते 13 दिवसांत दिसू लागतात. जरी काहीवेळा यास 5 ते 21 दिवस लागू शकतात. संसर्ग झाल्यास, ताप, डोकेदुखी, थकवा आणि पाठदुखी यांसारखी लक्षणे पुढील ५ दिवसांत दिसून येतात. ताप आल्याच्या तीन दिवसांत त्वचेवर पुरळ उठू लागते. मंकीपॉक्स हा कोरोनासारखा पसरत असेल पण तो कोविडसारखा प्राणघातक नाही. मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास घाबरू नका. मंकीपॉक्सच्या लक्षणांवरून समजून घ्या आणि उपचार घ्या.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news