ताज्या बातम्या

'मंकीपॉक्स' आजाराचं बदललं नाव; MPOX नवं नाव, WHO ची घोषणा

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. त्यासोबतच मंकीपॉक्स या आजारानेसुध्दा सगळीकडे धुमाकूळ घातला होता.

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. त्यासोबतच मंकीपॉक्स या आजारानेसुध्दा सगळीकडे धुमाकूळ घातला होता. याच पार्श्वभूमीवर आता WHOने एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी (28 नोव्हेंबर) रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्सचे नाव बदलून 'एमपॉक्स' (MPOX) असं जाहीर केलं आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा अनेकदा यासंदर्भात वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत WHO ला माहिती देण्यात आली. यावर चिंता व्यक्त करत अनेक देशांनी डब्ल्यूएचओला या आजाराचं नाव बदलण्यास सांगितलं होतं.

तसेच सल्लामसलत केल्यानंतर, WHO नं मंकीपॉक्ससाठी एक नवं नाव लागू करण्याचा निर्णय घेतला, जो MPOX आहे. दोन नावं वर्षभर एकत्र वापरली जातील, तर 'मंकीपॉक्स' नंतर वगळण्यात येतील. हे नवं नाव पुरुषांच्या आरोग्य संघटनेनं REZO प्रस्तावित केलं होतं.असे WHOने सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, दोन्ही नावं सुमारे एक वर्ष वापरली जातील आणि नंतर मंकीपॉक्स या नावाचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद होईल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी