नवी दिल्ली : केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी एएनआयला सांगितलं की, काही दिवसांपूर्वी पीडित व्यक्ती आखाती देशांमध्ये गेली होती. तिथून आल्यानंतरच त्याच्या शरिरात मंकीपॉक्सची लक्षणं दिसली होती. त्यानंतर त्याची चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यानं सांगितलं की, त्याचे वडील, आई, टॅक्सी ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटवरील 11 सहप्रवासी सुद्धा सापडले आहेत. मंकीपॉक्स या विषाणूमुळे तापाच्या लक्षणांव्यतिरिक्त वेगळ्याच पद्धतीचे पुरळ उठतात. सहसा हे सौम्य असतं. यामध्ये दोन मुख्य प्रकारांचं वर्णन केलेलं आहे. यातला पहिला आणि अतिशय गंभीर प्रकार म्हणजे 'काँगो स्ट्रेन'. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, त्यामुळे 10 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. तसंच पश्चिम अफ्रिकेतला एक प्रकार आहे त्यामुळे १ टक्के लोकांचा मृत्यू होतो. दोन महिन्यांपूर्वी मंकीपॉक्सच्या काही प्रकरणांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत होते. मुख्यतः आफ्रिकेच्या पश्चिम आणि मध्य प्रदेशात हा विषाणू आढळतो. मंकी पॉक्सची बहुतेक प्रकरणं युनायटेड किंगडम, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये नोंदवली गेली आहेत.