ताज्या बातम्या

भाजपला मिरजेत धक्का,भाजपाला रामराम ठोकत मोहन वनखंडे काँग्रेसमध्ये दाखल

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये भाजपाला आणखी एका धक्का बसला आहे. मिरज भाजपाचे नेते आणि अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी भाजपाला रामराम ठोकत, काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.कोल्हापूर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मोहन वानखडे हे भाजपाच्या मिरज विधानसभा क्षेत्राचे तीन वेळा प्रमुख राहिले आहेत, त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे दीर्घकाळ स्वीय सहाय्यक म्हणून देखील काम केले आहे, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री खाडे यांच्यासमोर मोहन वनखंडे यांची उमेदवारी तुल्यबळ मानली जात आहे.

मोहन वनखंडे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, विद्यमान मंत्री व सलग चार निवडणुका खाडे यांनी जिंकल्या असल्याने त्यांना वगळून अन्य कोणाच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचा त्याग करून त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Chandrakant Handore | खासदार चंद्रकांत हंडोरेंना अटक करा; माजी खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

निवडणूक आयोगाच्या निर्देशनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 111 पोलिसांच्या तातडीने बदल्या

CM Eknath Shinde | 'कुणाचा बाप आला तरी...' ; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र तर लाडक्या बहिणींना केलं 'हे आवाहन'

Devendra Fadnavis on Sharad Pawar | मराठा आंदोलकांच्या मागणीला पवारांचं समर्थन नाही, देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत