ताज्या बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टिंगच्या माध्यमातून जनतेशी साधला संवाद; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. दसरा म्हटलं की सोनं लुटणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं हे दरवर्षी आपण करत आलो आणि करतो. महाराष्ट्राचं सोन तर गेलं अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटतो आहे. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचं सर्व सोनं लुटून चाललेलं आहेत. पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वत:च्या आयुष्यात मजगूल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मजगूल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी?

आजचा दसरा हा खूप महत्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावरती आहे. अशावेळेला तुम्ही बेसावध होऊन चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय हे सगळं पक्ष आपापलं खेळ करत राहतात. या सगळ्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राची प्रगती अशी कुठं चालली आहे मला जरा सांगा. नुसतं रस्ते बांधणं, ब्रीज बांधणं ही प्रगती नसते. म्हणजे आमच्या हातामध्ये मोबाईल फोन आलं आणि आमच्या घरात कलर टिव्ही आला. या गोष्टीला तुमचं गॅजेट म्हणजे प्रगती नव्हे. प्रगती समाजाची व्हावी लागते. ज्यावेळेला आपण जगात बघतो, परदेशात ज्यावेळी आपण जातो. तेव्हा परदेशातलं देश पाहतो. त्याला प्रगत देश म्हणतात.

अजूनही आपण चाचपडतो आहोत. पण इतक्या वर्षांच्या तुम्हाला प्रगतीच्या थापा मारुन देखील तुमच्यातला कधी राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच माणसांना दरवेळी निवडून देता आणि काही नाही पश्चातापाचा हात कपाळावरती मारत राहायचा. 5 वर्ष बोंब मारायची. आपण म्हणतो ना पांडवांनी ती शस्त्र शमीच्या झाडावरती ठेवली होती. तुम्ही ऐन मोक्याच्या वेळेला शस्त्र झाडावरती नेऊन ठेवता. जे मतदानाचं शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे ते मतदानाच्यादिवशी न वापरता या सगळ्या लोकांना शिक्षा न करता तुम्ही जी नुसती शस्त्र वरती ठेऊन देता आणि निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवर बोलत राहता. मग मतदानाच्या दिवशी काय होतं. हा माझ्या जातीचा, हा माझ्या जवळचा, हा माझ्या ओळखीचा असं करुन राज्य नाही उभं राहत, राष्ट्र नाही उभं राहत. आज तुम्हाला संधी आलेली आहे.

माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे. सर्वांना संधी दिलीत तुम्ही. मी 13 तारखेला उद्याच आपला मेळावा होणार आहे. त्यावेळी मी सविस्तर या गोष्टी बोलणारच आहे आपल्याशी. पण आज दसऱ्याच्यानिमित्ताने शुभेच्छा देताना काही दोन शब्द आपल्याशी बोलावसं वाटलं म्हणून मी आता बोलतो आहे. पण खरं तर ही निवडणूक या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत जे तुम्ही करत आलात. ज्या लोकांना आजपर्यंत तुम्ही जोपासलं, सांभाळलं ते तुमच्या मतांची प्रतारणा करत आलेत. तुम्हाला अत्यंत गृहीत धरलं गेलं आणि हे दरवेळेला गृहीत धरणं आहे हेच मला वाटतं महाराष्ट्राचं नुकसान करत आलं आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींना, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य सगळ्यांनाच माझी हात जोडून विनंती आहे की, याच्यानंतर येणाऱ्या दसरानंतरची जी निवडणूक आहे त्याला बेसावध राहू नका. त्या शमीच्या झाडावरची शस्त्र आता उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे, ही वचपा घेण्याची वेळ आहे. आताच ती शस्त्र उतरवून या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल. गेली 5 वर्ष, गेली अनेकवर्ष खासकरुन तुमच्या मतांची ज्यांनी प्रतारणा केली, ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं. वेड्या वाकड्या युती आणि वेड्या वाकड्या आघाड्या करत बसलं. आज बोलतील सगळेजण. संध्याकाळच्या त्यांच्या मेळाव्यामध्ये. एकमेकांची ऊणीधुणी काढतील पण त्यात तुम्ही कुठं असणार आहात. तुम्ही नसणारच आहात, महाराष्ट्र नसणारच आहे.

यासोबतच ते म्हणाले की, मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतो आहे. गेली अनेक वर्ष पाहतो आहे. ही साकारण्याची संधी मला कुणीतरी माझ्याबरोबर माझ्या सहकार्यांना मिळू दे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हेच माझं स्वप्न आहे. आताच त्या शमीच्या झाडावरुन सर्व शस्त्र उतरवा आणि ज्यादिवशी मतदान असेल त्यादिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या. एवढेच मी आजच्या दसऱ्याच्यानिमित्ताने तुम्हाला सांगेन. असे राज ठाकरे म्हणाले.

Diwali 2024: दिवाळीत दाराबाहेर दिवे लावताय! यावेळी दिव्यांची "या"प्रकारे करा खास सजावट

Malad Road: मुलाला वाचवण्यासाठी आई बनली ढाल! तरी जमावाची युवकाला निपचित पडेपर्यंत मारहाण

Manoj Jarange | आचारसंहिता लावुन मराठ्यांचं वाटोळं केलं- मनोज जरांगे संतापले

Baba Siddique हत्याप्रकरणातील चौथा आरोपी पकडला

Maharashtra Vidhansabha Election Date|महाराष्ट्राच्या विधानसभेची तारीख जाहीर | #election2024