'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लब पत्रकार परिषद घेत मनसेचा जाहीरनामा सादर केला आहे.
हा फक्त जाहीरनामा नाही तर त्यात केलेल्या घोषणा कशा पद्धतीने पूर्ण करणार? हे सुद्धा दिले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाले आहे. या १९ वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मनसेच्या जाहीरनाम्यात काय?
जाहिरनाम्यात पहिला सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान दिला आहे. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. पुढच्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा सेक्शन, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, 17 तारखेची शिवाजी पार्कवरील सभेला अजून परवानगी नाही मिळाली आम्ही सभा रद्द करत आहोत. अशी घोषणा केली आहे. तर सभेऐवजी महाराष्ट्र दौरा करणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे.