Admin
ताज्या बातम्या

सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय? - प्रकाश महाजन

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे. प्रकाश महाजन म्हणाले की, सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरं जावं लागणार आहे, अशी टीका करतानाच काल परवा मुसलमान झाल्यासारखं सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरतायत, असा हल्लाही त्यांनी चढवला. मातोश्री-2 कशी झाली ते सांगावं? सुषमा अंधारेंची सभा कालच झाली. या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. काय बोलली ती? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.

यासोबतच सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? असा संतप्त सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे. सुषमा अंधारेना पुत्रमोह होऊ शकत नाही, कारण त्यांची वेगळी अडचण आहे. अशी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी कालच्या मुलुंड येथील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर महाजन बोलत होते.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का