निसार शेख, चिपळून: रत्नागिरी जिल्ह्याची संस्कृतीक राजधानी असलेल्या आपल्या चिपळूण तालुक्याला अवैध धंदे आणि अंमली पदार्थ्यांचे सेवन या समाजघातक गोष्टींनी व्यापले आहेत. या सगळया प्रकारामुळे तरुण पिढीतील मुले व मुली यांचे भवितव्य अंधारात आहे. रात्री अपरात्री कामानिमित्त जाणायेणाऱ्या माता, भगिनी व नागरिकांना याचा त्रास होऊन एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण यांच्यातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.बारी यांना सदर विषयात जातीने लक्ष घालून अवैध धंदे व अमली पदार्थांचे सेवन करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
यासंबंधीचे निवेदन देताना जिल्हा सचिव श्री संतोष जी नलावडे साहेब, तालुकाध्यक्ष श्री.अभिनव जी भुरण, शहर सचिव श्र. स्वप्निल घारे, उपशहर अध्यक्ष संदेश सुरवसे,वार्ड अध्यक्ष श्री.विनोद चिपळूणकर, शाखाध्यक्ष श्री सुदेश फके, मनविसे उपजिल्हाध्यक्ष गुरुनाथ नागेश, महाराष्ट्र सैनिक परेश साळवी, स्वाती हडकर, नंदन गावडे व अमित कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.