अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी 23 तासांपासून सुरु आहे. या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजीत पाटील आणि कॉंग्रेसचे धीरज लिंगाडे पाटील यांच्यात लढत आहे. एकूण 1 लाख 2 हजार 587 मतदान झाले होते. यातील अवैध मते ही 8 हजार 387 होती. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 47 हजार 101 चा कोटा पूर्ण करावा लागतो. धिरज लिंगाडे यांना हा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 हजार 584 मते आवश्यक आहेत. तर डॉ रणजित पाटील यांना 5 हजार 930 मते कोटा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी अवैध मतांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली होती. 8 हजार 735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी झाली. ज्यामध्ये 348 मतं वैध झाली. यामध्ये धिरज लिंगाडे यांना 177 मतं मिळाली तर डॉ. रणजित पाटील यांना 145 मतं मिळाली आहेत. अवैध मतांची फेरमोजणी केल्यानंतर डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 171 मते मिळाली आहेत. अद्याप अंतिम निकाल हाती आलेला नाही.