विधीमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली आहे. यानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.