Rohit Pawar 
ताज्या बातम्या

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

Published by : Naresh Shende

Rohit Pawar Tweet Viral : बीड लोकसभा मतदारसंघासाठी १३ जूनला मतदान पार पडले. परंतु, या मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर केला आहे. पवारांनी सोशल मीडियाच्या एक्स माध्यमावर तीन ट्वीट करत व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तीन ट्विट करत काय म्हणाले आमदार रोहित पवार?

रोहित पवारांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली. निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे ? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत .

रोहित पवारांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय, बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही.निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

तसंच रोहित पवारंनी तिसरं ट्वीट करत म्हटलंय, मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजाताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल. महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया.

इथे पाहा रोहित पवारांनी ट्वीट केलेला व्हिडीओ

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा