परभणी | खालीद नाझ : गंगाखेड विधानसभेचे रासपचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर एका महिलेने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या इतर 35 समर्थकांनी महिलेच्या शेतात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप महिलेने केलाय. एवढंच नाही तर आमदारांच्या समर्थकांनी देखील विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलिसा मारहाण तसेच विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नाकर गुट्टे आणि अन्य लोकांविरोधात 354 (ब) 324, 184, 147, 149, 323, 504, 506 आणि 135 बी.पी.अॕक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना डॉ गुट्टे यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. अशी काही घटना घडलीच नाही, जो काही प्रकार झाला आहे त्याचे सर्व व्हिडीओ त्यांनी स्वतः पोलोसांना दिले आहेत असं रत्नाकर गुट्टे म्हणाले आहेत.