ताज्या बातम्या

पाटणी - गवळी वाद मिटला?

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी व खा. भावना गवळी यांचा गेल्या अनेक वर्षाचा वाद जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांविरूद्ध पोलिसात तक्रारी दिल्या होत्या तर गवळींनी कशी शिवीगाळ केली याचा एक व्हिडीओही भाजप कडून प्रसारित केला होता.

Published by : Siddhi Naringrekar

गोपाल व्यास, वाशिम

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी व खा. भावना गवळी यांचा गेल्या अनेक वर्षाचा वाद जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांविरूद्ध पोलिसात तक्रारी दिल्या होत्या तर गवळींनी कशी शिवीगाळ केली याचा एक व्हिडीओही भाजप कडून प्रसारित केला होता व गवळी यांनी माफी न मागितल्यास अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा देखील आमदार पाटणी यांनी दिला होता

त्यानंतर अनेक दिवस जिल्ह्यात तणाव होता. भाजप शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता त्याच पाटणी यांचा फोटो बॅनर वर प्रमुख उपस्थितीत झळकत असल्याने या दोघांचा वाद मिटला का ? आ. पाटणी या मेळाव्याला उपस्थित राहणार का? अशी चर्चा देखील मोठया प्रमाणात झाली होती.

मात्र आज भाजपचे आमदार लखन मलिक व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र आमदार राजेंद्र पाटनी यांनी या मेळाव्यात अनुपस्थित दाखवल्याने तब्बल वर्षभराने गवळी मतदार संघात खा.भावना गवळींच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रर केल्या नंतर ईडीने त्यांच्या विरोधात कारवाई केली होती तेव्हापासुन खासदार गवळी मतदार संघात आल्या नव्हत्या. भाजपने त्या हरवल्याची तक्रार करत यवतमाळमध्ये आंदोलनही केले होते. आता तब्बल वर्षभर नंतर त्या मतदारसंघात आल्या आहेत.आणि जोरदार शक्तिप्रदर्शन सुध्दा केले.

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल

IPL Retention 2025: चार कर्णधारांना धक्का, रोहित शर्मा मुंबईत कायम?

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून होणार सुरुवात

मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे