लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशातील 8 राज्यांतील 49 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आज मतदान पार पडत आहे. आमदार गणेश नाईक यांनी आज कोपरखैरणे येथे मतदान केंद्रावर जाऊन सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार गणेश नाईक म्हणाले की, मी पहिलं मत महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांना दिलेलं आहे. आजचा दिवस हा महाउत्सवाचा दिवस आहे. देशाचं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून देशाचं प्राबल्य निर्माण करुन जगातल्या अन्य भयभीत असलेल्या देशातील जनतेला एक दिलासा देण्याकरता नेतृत्व निश्चितपणे कामाला येईल.
याकरता महायुतीचं सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नवी मुंबईतली महायुतीचा प्रत्येक घटक त्या यशाला गवसण्याकरता यश संपादनकरण्याकरता अतिशय आनंदाने लोकशाहीच्या सर्व मूल्यांची जतन करुन काम करीत आहे. ते यश निश्चितपणे मिळेल. असे गणेश नाईक म्हणाले.