आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपण माननीय बच्चू कडू यांच्या गेल्या 5 - 10 वर्षातल्या सगळ्या भूमिका पाहा. ते सकाळी एक संध्याकाळी दुसरंच असतं काहीतरी. त्यामुळे त्यांनी कुठली राजकीय भूमिका ठाक घेतली ती दाखवा मला. त्यांनी गेल्या अडीच वर्षात या सरकारमध्ये कितीवेळा अल्टिमेटम दिला तो पाहा. त्या अल्टिमेटमचं काय झालं. त्यामुळे प्रत्यक्षात जे काही करतील, भूमिका घेतली तेव्हा बघू काय करायचं ते. त्यांचे सामाजिक कार्य वेगळं आहे, चांगलं आहे. त्याचं खरंतर मला कौतुक आहे.
यासोबतच ते म्हणाले की, त्यांची राजकीय जी चाल आहे ती कधीच ठाम नव्हती. भूमिका ठाम नव्हती. ती आताही ठाम असेल असं मला वाटत नाही. खरंतर आदरणीय उद्धवजी यांनी त्यांचा सन्मान केला होता. त्यांना मंत्रीपद बहाल केलं होते. काय झालं पुढे त्याचं. आज ते अडीच वर्षात ताटकळत राहिले ना. जिथे त्यांची किंमत आहे तीच त्यांना कळत नाही. समाजाने याचा विचार केला पाहिजे आपण आपले नेतृत्व कुणाकडे देतो. ते नेतृत्व आपल्याला न्याय देतं का? त्यांच्या भूमिका या रोज बदलणाऱ्या भूमिका असतात. असे अरविंद सावंत म्हणाले.