गजानन वाणी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवत असतात. हिंगोलीच्या वसमत कळमनुरी तालुक्यातील अनेक गावा मध्ये आज सकाळी पाच वाजून 52 मिनिटांनी भूकंपाचे सोम्य जाणवले.
भूकंपाचं मुख्य केंद्रबिंदू नांदेड असून 3.8 रिश्टर स्केल मीटर भूकंपाची नोंद भूकंप भूमापक केंद्राकडे झाली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्रबिंदू नांदेड असल्याने नांदेड सीमा वरती भागातील कळमनुरी वसमत या भागातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
भूकंपाच्या धक्क्याने जिल्ह्यात कुठेही नुकसान झाले नसून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.