Mhada 
ताज्या बातम्या

म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

‘म्हाडा’च्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर आहे. अर्जविक्री प्रक्रियेला अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसादच न मिळाल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे.

Published by : Team Lokshahi

म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर आहे. अर्जविक्री प्रक्रियेला अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसादच न मिळाल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे. अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाने २,२६४ घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. मात्र, अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. ११ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान २,५१४ अर्ज दाखल झाले आहेत. अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली असून आता अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. त्यानुसार लवकरच मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

थोडक्यात

  • ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर

  • अर्जविक्री प्रक्रियेला अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद

  • प्रतिसादच न मिळाल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की

  • अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली

‘ मुदतवाढ दिल्यास २७ डिसेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. कोकण मंडळाच्या घरांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असताना कोकण मंडळाची घरेच विकली जात नसल्याचे चित्र आहे. रिक्त घरे विकण्यासाठी मंडळाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. रिक्त घरांच्या विक्रीची चिंता असतानाच आता मंडळाच्या सर्वसाधारण सोडतीतील घरांकडेही इच्छुकांनी पाठ फिरविली आहे. प्रक्रिया सुरू होऊन ४० दिवस पूर्ण झाले, तरी या प्रक्रियेला प्रतिसादच मिळताना दिसत नाही. २,२६४ घरांसाठी ८,३५९ जणांनी अर्ज भरले आहेत. पण, यातील केवळ २,५१४ जणांनीच अनामत रकमेचा भरणा करून प्रत्यक्षात अर्ज दाखल केले आहेत. ही संख्या खूपच कमी असून आता अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अर्जविक्रीची मुदत १० डिसेंबरला, तर अनामत रकमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत १२ डिसेंबरला संपणार आहे.या पार्श्वभूमीवर आता अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे.

नागराज मंजुळे यांना समन्स, काय आहे प्रकरण?

नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती माहित आहे का? जाणून घ्या

Nahur News | नाहूरमध्ये हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, व्हिडीओ व्हायरल | Lokshahi Marathi

Bhawana Gawali : भावना गवळींना मंत्रिपदाचे वेध | भावना गवळी कार्यकर्त्यांसह मुंबईत ठाण मांडून

Latest Marathi News Updates live: भाजप-शिंदेंमध्ये नाराजी?