22 मे रोजी 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी आज (14 ऑगस्ट) सोडत काढण्यात येणार आहे.
सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन इथे उभारण्यात आलेल्या 4082 घरांच्या विक्रीसाठी ही सोडत निघणार आहे.
अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा यासाठी सभागृहाच्या आवारात आणि सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात सोडत सकाळी 11.30 वाजता काढण्यात येणार आहे. https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवर क्लिक करुन तुम्ही म्हाडा मुंबई बोर्डाच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहात.