विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, 18 जानेवारी रोजी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. दोन मार्गावर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा मार्ग निश्चित करायचा आहे. अन्यथा तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे - दिवसा कोणताही ब्लॅाक नाही.
हार्बर मार्ग
कुठे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी / वांदे अप आणि डाऊन मार्गावर,
कधी: सकाळी 11:40 ते सायंकाळी 4:40 पर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11:16 ते सायंकाळी 4:47 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10:48 ते सायंकाळी 4:43 वाजेपर्यंत वांद्रे-गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 9:53 ते दुपारी 3:20 पर्यंत व गोरेगाव / वांदे येथून सकाळी 10:45 ते सायंकाळी 5:13 पर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
मध्य रेल्वे
कुठे: ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी: सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9:30 ते दुपारी 2:45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद / नीम-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि 10 मिनिटे विलंबाने धावतील, कल्याण येथून सकाळी 10:28 ते दुपारी 3:25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद / अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.