थोडक्यात
ब्लॉकची तारीख आणि वेळ: हा ब्लॉक १६ नोव्हेंबर रात्री ११.३० वाजता सुरू होईल आणि १७ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजता संपेल.
प्रभावित उपनगरीय रेल्वे सेवा: या ब्लॉकमुळे काही उपनगरीय रेल्वे सेवा थांबू शकतात किंवा उशीर होऊ शकतो.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम: मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रवाश्यांसाठी महत्वाती बातमी समोर आली याहे. पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी ते गोरेगाव यादरम्यान पूल क्रमांक ४६चे पुनर्निर्माण करण्यासाठी १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक १६ नोव्हेंबर रात्री ११.३० वाजता सुरू होईल आणि १७ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजता संपेल. या कार्यामुळे काही उपनगरीय रेल्वे सेवा तसेच मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यानच्या ब्लॉककाळात, अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली यादरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. मात्र, या जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या राम मंदिर स्थानकात थांबणार नाहीत.तसेच, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या ब्लॉक कालावधीत फक्त अंधेरीपर्यंतच धावतील.
स्थानक : जोगेश्वरी ते गोरेगाव मार्ग : धीमा अप-डाउन, हार्बर अप-डाउन
वेळ : शनिवार रात्री ११.३० ते रविवार सकाळी ११.३० वाजता
अंधेरी आणि गोरेगाव / बोरिवलीवरील अप-डाउन धीम्या