केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत आज बैठक होणार आहे. 2 नावांवर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड करण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची समिती दोन आयुक्तांची नाव निश्चित करेल अशी माहिती मिळत आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील समितीची त्यासाठी बैठक होणार आहे. कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या अध्यक्षतेत समितीने 5 नावांवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.