ताज्या बातम्या

Mathura Train Accident: ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला! रेल्वे रूळ सोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला आहे. ट्रेन चालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि प्लॅटफॉर्मवर चढली

Published by : shweta walge

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला आहे. ट्रेन चालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि प्लॅटफॉर्मवर चढली. यावेळी रेल्वेत आणि प्लॅटफॉर्मवर कुणी नागरिक नसल्याने जीवित हानी टळली. अचानक रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्याने नगरिकांमध्ये गोंधळ उडाला.

रात्री दहाच्या सुमारास शटल (लोकल) ट्रेन नवी दिल्लीहून मथुरा येथे पोहोचली. मथुरा शेवटचं स्थानक असल्यामुळे सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले. यानंतर ट्रेनचे शटर लावून ती ठरलेल्या ठिकाणी उभी करण्यात येणार होती. ट्रेन थांबवण्यासाठी मोटरमनला ब्रेक लावावा लागला, मात्र त्यानं चुकून एक्सलेटर दाबला आणि ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली. परंतु, प्रवासी नसल्यानं कोणतीही जीवितनाही झालेली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

मात्र ही चूक मोटरमनची होती की, तांत्रिक हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाचा कोणताही अधिकारी कॅमेरासमोर काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र, इंजिन हटवल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. 

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी