मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यात भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. हरदा येथील फटाक्यांच्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला आहे. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 59 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळावर 50 रुग्णवाहिका दाखल करण्यात आले आहेत.
हरदा शहरातील मगरधा रोडवरील बैरागढ गावात हा फटाका कारखाना आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाच्या धडकेमुळे वाहनासह अनेक पादचारी दूर फेकले गेले. कारखान्याच्या आजूबाजूला बांधलेल्या घरांमध्ये बारूद ठेवल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटानंतर 60 घरांना आग लागली. खबरदारी म्हणून 100 हून अधिक घरे रिकामी करण्यात आली आहेत. हरदा परिसरातील सात जिल्ह्यांतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
मध्य प्रदेश हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.