Marcus Stoinis  
ताज्या बातम्या

मार्कसने कंबर कसली! १२४ धावांची नाबाद खेळी करुन IPL मध्ये रचला इतिहास, १३ वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Published by : Naresh Shende

चेन्नई सुपर किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने धडाकेबाज फलंदाजी करून लखनऊ सुपर जायंट्सला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. स्टॉयनिसने ६३ चेंडूत १२४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. यामध्ये १३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. स्टॉयनिसनच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊला चेन्नईविरोधात विजय संपादन करता आलं. या विजयामुळं लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्टॉयनिसने १२४ धावांची नाबाद खेळी करून आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. मार्कस स्टॉयनिस आयपीएलमध्ये रन चेज करताना सर्वात मोठी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. स्टॉयनिसने १३ वर्षांपूर्वी पॉल वाल्थाटीने केलेला विक्रम मोडला आहे.

पॉल वाल्थाटीने २०११ मध्ये रन चेज करताना चेन्नईविरोधात १२० धावांची नाबाद खेळी केली होती. तर विरेंद्र सेहवाग रन चेज करताना सर्वात मोठी खेळी करणारा तिसरा फलंदाज आहे. सेहवागने २०११ मध्ये डेक्कन चार्जर्सविरोधात रन चेज करताना ११९ धावांची खेळी केली होती.

आयपीएलमध्ये यशस्वी रन चेज करताना सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

मार्कस स्टॉयनिस (२०२४) - नाबाद १२४ धावा

पॉल वाल्थाटी (२०११) - नाबाद १२० धावा

वीरेंद्र सेहवाग (२०११) - ११९ धावा

सीएसकेनं प्रथम फलंदाजी करून लखनऊपुढं २११ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊने २१३ धावा केल्या आणि या सामन्यात विजय मिळवला. चेपॉक स्टेडियमवर आतापर्यंतचं हे सर्वात मोठं रन चेज आहे. लखनऊने या सामन्यात विजय मिळवल्यानं गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर धडक घेतली आहे. तर दुसरीकडे चेन्नईच्या संघाचा पराभव झाल्यानं त्यांचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू