ताज्या बातम्या

Eknath Shinde: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; एकनाथ शिंदे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनी मोठी घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

एकनाथ शिंदे ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले की,

माझा मराठाचि बोलु कौतुके।

परि अमृतातें ही पैजा जिंके ॥

समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!

#मराठी #माय_मराठी

महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण असून मराठी भाषा आता सातासमुद्रापार जाऊन पोहोचणार आहे. गुरुवारी म्हणजेच आज 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी