पुण्यातील डेक्कण एजूकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अभिनेते शरद पोंक्षे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे, प्रत्येक गावात असे विद्यालय हवेत, सावरकरांच्या असे कार्यक्रम व्हायला हवे अशी इच्छा व्यक्त केली. सावरकरांबद्दल (Sawarkar) बोलताना ते म्हणाले की, रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात, ही मुलं बघा अन दिल्लीतला मुलगा बघा. या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर कळत नाही असं म्हणत शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी राहुल गांधी यांचं नाव घेता टीका केली
सावरकरांवर आधारित कार्यक्रमाचं सादरीकरण झाल्यानंतर शरद पोंक्षे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी कार्यक्रम पाहताना रडतोय. ज्या मनापासून सावरकर पोहचवताय, गाणी अर्थ सांगत आहेत हे खूप प्रभावी आहे. मी सुद्धा काय करता येईल हा विचार करतोय. ताकदीनं सावरकरांचे हे कार्यक्रम करा, सावरकरकरांच्या कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभरात पसरले पाहिजे. आता माझे फार जवळचे स्नेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीनं बघायला लावेन. महाराष्ट्रातील शाळेत कार्यक्रम झाले पाहिजे. अनेक शाळेत सावरकरांचे फोटो लावले जात नाही, धडा शिकवला जात नाही. विद्यार्थ्यांना भलतंच शिकवलं जातं. असे कार्यक्रम महाराष्ट्र शासनाला सुरु करायला लावू, यातील अनेक मुलं भविष्य आहेत असं पोंक्षे म्हणाले.