ताज्या बातम्या

जरांगे पाटलांच्या सभेदरम्यान उष्मघाताने मराठा समाज बांधवाचा मृत्यू; जरांगे पाटलांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार

शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात विराट सभा पार पडली.

Published by : shweta walge

शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात विराट सभा पार पडली. या सभेदरम्यान एका मराठा बांधवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मनोज जरांगे याच्या सभेसाठी आलेल्या मराठा बांधवाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. विलास पवार असं मृत्युमुखी पडलेल्या समाजबांधवाचं नाव आहे. जरांगे पाटलांच्या सभेसाठी लाखोंचा जनसमुदाय अंतरवाली सराटी येथे दाखल झाला होता आणि हीच सभा ऐकण्याकरिता विलास पवार देखील गेले होते. मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उष्माघाताने पवार यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

आज गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे देखील अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. पवार यांच्या कुटुंबियांना मराठा समाज उघड्यावर पडू देणार नाही. असं जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी