Admin
ताज्या बातम्या

नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अनेक नियम बदलले; जाणून घ्या काय झाले बदल

या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अनेक नियम बदलले आहेत. आजपासून देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर टोल टॅक्स वाढू शकतो. अनेक द्रुतगती मार्गांवर टोलवाढ जाहीर करण्यात आली आहे. अनेक द्रुतगती मार्गांवर टोलवाढ जाहीर करण्यात आली आहे. 18 टक्के अधिक टोल भरावा लागणार आहे.

हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत असेलआजपासून नवीन आयकर प्रणालीमध्ये नवीन स्लॅब लागू झाले आहेत. यासोबतच प्राप्तिकरातील मूळ सूट मर्यादाही 50 हजार रुपयांनी वाढली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत आज एलपीजी सिलेंडरची किंमत निश्चित होणार आहे.

सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य झालं आहे. आजपासून फक्त 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. तसेच जीवन विमा पॉलिसींमधून मिळू शकणार्‍या करमुक्त उत्पन्नावर मर्यादा घालण्यात आली आहे. डेट म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल.

पगारदार व्यक्ती आणि निवृत्तीवेतनधारकांना 50 हजार रुपयांच्या स्टॅंडर्ड डिडक्शनचा लाभ देण्यात येईल. ऑनलाईन गेम जिंकण्यावरुन कर कपातीसाठी यापूर्वी उपलब्ध असलेली सूट सरकारने काढून टाकली आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी (SCSS) कमाल ठेव मर्यादा 15 लाख रुपयांवरुन 30 लाख रुपये करण्यात आली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी