मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळकृष्ण ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.ढाकणे हा स्पर्धा परीक्षा देत असल्याचीही माहिती मिळत आहे.
गुरुवारी (31 ऑगस्ट) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास 112 वर फोन करून मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं नाही तर मंत्रालयात ठेवलेल्या बॅाम्बने मंत्रालय उडवून देईल अशी धमकी दिली होती. बाळकृष्ण ढाकणे याने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.