मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावर तोगडा काढण्यासाठी सरकारने लक्ष्मण हाके, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्रित करुन निर्णय घ्यावेत आणि बैठक घ्यावी", असा मार्ग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुचवला होता. यावरच मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले की, शरद पवार काय म्हणातात त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार, माझे संस्कार नेमके काय सांगतात ते अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं मराठ्यांचं कल्याण व्हावं, गोरगरिबांचं कल्याण व्हावं. तसंच लिंगायत समाजाचंही कल्याण व्हावं. गोरगरीब धनगरांनाही आरक्षण मिळायला पाहिजे. कैकाडी आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे, त्यांनाही आरक्षण मिळायला पाहिजे. ती माझी प्रामाणिकपणाची भावना आहे.
सरकार फक्त आरक्षण देऊ असं म्हणत आहे. सरकारने जे करायचं ते स्पष्टपणे करावे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्याला देखील वॅलिडिटी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारशी चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे. पावसामुळे नेट बंद आहे. तसेच उद्यापासून बैठका घेणार असून पाडल्याशिवाय पर्याय नाही. समीकरण जुळवावे लागणार आहे. आमची धग मराठवाड्यापुरती नाही असे सांगत मुंबईतदेखील आमदारांना बसणे कठीण झाले आहे. असे सांगत सत्ताधारी आणि विरोधी दोघांची जबाबदारी आहे. दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. दुसऱ्याच्या गळ्यात लफडं गुंतवण देण्याची सवय राजकारणी यांची आहे. एकमेकांवर ढकलने दोघांना परवडणार नाही, एक झटका लोकसभेत दिला आहे. असे मनोज जरांगे म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार?
मराठा समाजासह लिंगायत, धनगर व मुस्लीम समाजांनादेखील आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, या जरांगे यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून दोन वर्गात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. मनाेज जरांगे, छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्याशी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढावा. चर्चेला आम्हालाही बाेलवावे, अस ते म्हणाले.