मराठा आरक्षणासाठी काल मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आज अर्जून खोतकर यांनी राज्य सरकारचा निरोप घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. जरांगे यांनी सरकारने सुधारीत जीआर काढण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने काढलेल्य जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती झालेली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.
मनोज जरांगे उपोषणावर का ठाम! वाचा 'हे' 9 मुद्दे
1. मनोज जरांगेंची उपोषणापासून माघार नाहीच.
2. मनोज जरांगेंचं उपोषण मागे घेण्यात सरकारला तिसऱ्यांदा अपयश.
3. सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगेंना अमान्य.
4. सरकारने काढलेल्या जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती झालेली नाही.
5. जीआरमध्ये दुरुस्ती होत नाही तोपर्यत माघार नाही.
6. 7 सप्टेंबरच्या शासनाच्या जीआरमध्ये अजूनही बदल नाहीत.
7. आमच्यावरील गुन्हे शासनाने अजून मागे घेतले नाहीत.
8. लाठीचार्ज करणाऱ्यावर पोलिसांवर अजून कारवाई नाही.
9. सरकारच्या जीआरमध्ये दुरुस्ती झाल्यावरच पाणी पिणार
भाजप नेते अर्जुन खोतकर यांनी उपोषण स्थळी दाखल होत राज्य सरकारचा लिफाफा जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला. त्यानंतर राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडत राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.