Manoj Jarange Patil  Lokshahi
ताज्या बातम्या

"बारस्कर नाही, छगन भुजबळच आमचा विरोधक..."; उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

अजय बारस्कर महाराज मुंबईतील सागर बंगल्यासमोर आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलनामुळं मराठा आणि ओबीसीत वाद सुरु असतात, असा आरोप बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर केला आहे,

Published by : Naresh Shende

Manoj Jarange Patil Press Conference : अजय बारस्कर महाराज मुंबईतील सागर बंगल्यासमोर आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलनामुळं मराठा आणि ओबीसीत वाद सुरु असतात, असा आरोप बारस्कर यांनी केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचा विरोधक कुणीच नाही. छगन भुजबळच आमचा विरोधक आहे. सरकारने दिलेल्या परिपत्रकात त्रुटी भरून काढण्याची गरज आहे. म्हणजे सरकारचा निर्णय आम्हाला शंभर टक्के मान्य होईल. एसईबीसी, इडब्ल्यूएस आणि ओबीसीचं म्हणजे कुणबीचं विकल्प खुले करा. त्यांच्याकडे या तिन्ही व्हॅलिडीटी नसतील, तर तो ओपन प्रवर्गातून प्रवेश घेईल. नोकरी किंवा प्रवेशाचा विषय असेल, तीन राऊंड एका महिन्यात होत नाही, असं मोठं विधान मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण सुरु केलं आहे. यावेळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांंवर भाष्य केलं आहे.

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी असतील यांनाही फी देण्याचं बोलले होते. मुलींना मोफत शिक्षण देण्याबाबतचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. सरकारने काल निर्णय घेतला आहे. त्यांच्या कामाबद्दल कौतुक केलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं आहे की, ईबीसी, ईडब्लूएस, एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा आणि शैक्षणिक शुक्लही घेऊ नका. असा निर्णय सरकारनं सर्व संस्थांसाठी लागू केला आहे.

काही अधिकारी विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. काही जातीयवादी आहेत म्हणून देत नाहीत. लाडका भाऊ-बहिण योजन सुरु केली, त्यामुळे काही अडणची येऊ लागल्या आहेत. तुम्ही जाणून बुजून गर्दी केली की गोरगरिबांना फायदा होऊ नये. प्रवेश घेताना व्हॉलिडीटीसाठी त्यांनी तुम्हाला नोंद दाखवली, तर त्याचा अर्ज स्वीकारा. त्याला एक महिन्याच्या ऐवजी सहा महिन्याची मुदतवाढ द्या. ज्या विद्यार्थ्यांकडे नोंदी नाहीत, त्यांना थेट रिजेक्ट करून ओपनमध्ये टाकण्याबाबत सांगितलं जातं.

ज्या नोंदी शोधायच्या बंद केल्या आहेत, त्या सुरु करा. तात्काळ व्हॅलिडिटी देण्यासाठी सांगा. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सोपं करा, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही ओबीसीली धक्का लावत नाहीत. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत नाहीत. आम्ही ओबीसी आहेत, तर आमचा एक भाऊ कुणबी आहे. आमचा दुसरा भाऊ कुणबी नाही. आमची आई कुणबी आहे, पण आमचा बाप ओपन वर्गात आहे, त्यांच्या मुलांना न्याय मिळेल, असं काम सरकारनं करावं, असंही जरांगे म्हणाले.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...