राज्यात महायुतीने बहुमत मिळवल्यानंतरही नवीन मुख्यमंत्री कोण, याचा तिढा अद्याप सुटला नाही. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या सगळ्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे ज्यामध्ये 'एकनाथ' है तो सेफ है' अस म्हटलं आहे.