गेल्या जवळपास वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, तरीही हिंसाचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. यातच आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उसळून आला आहे.
थोडक्यात
मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती
कुकी दहशतवाद्यांवर कारवाईच्या ठरावामुळे 'कोकोमी'चा निर्णय
6 जणांची हत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
'अफस्पा' लागू केलेला निर्णय रद्द करण्याची 'कोकोमी'ची मागणी
मणिपूरमधील आंदोलन आठवडाभर स्थगित आहे. कुकी दहशतवाद्यांवर कारवाईच्या ठरावामुळे 'कोकोमी'ने निर्णय घेतला आहे. 6 जणांची हत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने 'कोकोमी'ने हा निर्णय घेतला आहे. संरक्षण दल कायदा रद्द करण्याचीही मागणी केली आहे.
कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा. तीन महिला, तीन मुले अशा सहाजणांची हत्या करणाऱ्या कुकी दहशतवाद्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी एनडीएच्या आमदारांनी केल्यानंतर आणि तसा ठराव संमत केल्यामुळे को-ऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटेग्रिटी (कोकोमी) या संस्थेने आपले आंदोलन आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले विशेष अधिकार कायदा लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा, अशी आमची मागणी आहे.