Manipur Landslide | Rain Affect Search Operation team lokshahi
ताज्या बातम्या

मणिपूर भूस्खलनात मृतांची संख्या 37 वर, 25 अद्याप बेपत्ता

सहा बेपत्ता जवानांचे आणि इतर 19 जणांचा शोध सुरू

Published by : Shubham Tate

Manipur Landslide Death Toll Rises : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनात मृत झालेल्या आणखी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यामुळे रविवारी झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली आहे. 25 जणांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (manipur landslide death toll rises to 37 rains affect search for missing)

शनिवारपासून तुपुल भागात पाऊस पडत आहे आणि भूस्खलनामुळे शोध मोहिमेवर परिणाम झाला आहे. गुवाहाटी येथील संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, ढिगाऱ्यातून आतापर्यंत 37 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 24 प्रादेशिक लष्कराचे कर्मचारी आणि 13 नागरिक आहेत. सहा बेपत्ता प्रादेशिक लष्कराचे जवान आणि इतर 19 जणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लष्कर, आसाम रायफल्स, प्रादेशिक सेना, SDRF आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल शोध मोहिमेत गुंतले आहेत. 'खराब हवामान असूनही शोध मोहीम सुरू आहे. काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि दरड कोसळली. आतापर्यंत प्रादेशिक लष्कराचे 13 जवान आणि पाच नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी