अमेरिकेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील एका खटल्यात सुनावणी होत असताना कोर्टाबाहेर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. ही घटना लोवर मॅनहॅटन कोर्टहाऊससमोर घडली आहे. आंदोलनासाठी असलेल्या कलेल्ट पाँड पार्कमध्ये व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले.
व्यक्तीचे नाव मॅक्सवेल अझारेलो असे असल्याचं कळत आहे. व्यक्ती गंभीर भाजला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मॅक्सवेल कोर्टहाऊसच्या बाहेर आला होता. त्याने काही पॅम्प्लेट देखील वाटले होते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत, मॅक्सवेल हा स्वत:वर काही द्रव टाकून घेतो, त्यानंतर तो खिशातून लायटर बाहेर काढतो आणि स्वत:ला पेटवून घेतो. काही सेकंदामध्ये त्याच्या संपूर्ण शरीराला आग लागते.