Admin
ताज्या बातम्या

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषण थांबेना; जुलै महिन्यात २२ बालकांचा मृत्यू

कुपोषणाने ग्रासलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तब्बल ५२ बालकांचा मृत्यू झाला होता, तर आता जुलै महिन्याची जिल्हा आरोग्य विभागाकडून आकडेवारी आली यात जुलै महिन्यात मेळघाटात ४५८ बालकांचा जन्म झाला यात जुलै मध्ये भरात तब्बल एकूण २२ बालकांचा कुपोषित असल्याने विविध आजारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, यात शून्य ते सहा वर्षे बालकांचे १५ मृत्यू झाले आहेत,

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

कुपोषणाने ग्रासलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तब्बल ५२ बालकांचा मृत्यू झाला होता, तर आता जुलै महिन्याची जिल्हा आरोग्य विभागाकडून आकडेवारी आली यात जुलै महिन्यात मेळघाटात४५८बालकांचा जन्म झाला यात जुलै मध्ये भरात तब्बल एकूण २२बालकांचा कुपोषित असल्याने विविध आजारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, यात शून्य ते सहा वर्षे बालकांचे १५ मृत्यू झाले आहेत

यात उपजत मृत्यू ७ मृत्यू झाले आहे, तर २६१ तीव्र कुपोषित बालके आहेत,मेळघाटातील बालमृत्यू संदर्भात प्रशासनाने जारी केलेली जुलै महिन्यातील बालमृत्यूची आकडेवारी पाहता ती गत वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न हद्दपार व्हावा म्हणून केंद्र, राज्य सरकार योजना राबविते. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केल्याचा दावा करते. हा प्रश्न सुटावा म्हणून अशासकीय संस्थांचीही संख्या अधिक आहे. तरीही प्रश्न पूर्णपणे सुटू शकलेला नाही, अलीकडेच राज्यातील एकाही मुलाचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जबाबदार धरू, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी