उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने मांडलेल्या प्रस्तावामुळे समाज माध्यमांवर चर्चांना उधाण आलं आहे. या प्रस्तावामध्ये महिलांना दिल्या जाणाऱ्या काही सेवा पुरुषांनी देऊ नये असा हा प्रस्ताव आहे.
थोडक्यात
पुरुषांनी शिंप्यांच्या दुकानात महिलांचे मोजमाप घेऊ नये
स्त्रीचे केस कापू नयेत
व्यायामशाळेत प्रशिक्षण देऊ नये
उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
पुरुषांनी शिंप्यांच्या दुकानात महिलांचे मोजमाप घेऊ नये, त्यांनी स्त्रीचे केस कापू नयेत किंवा तिला व्यायामशाळेत प्रशिक्षण देऊ नये, असे प्रस्ताव उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने विचारार्थ मांडले आहेत.
महिलांचे संरक्षण करणे आणि ‘सहेतुक स्पर्श’ व पुरुषांचा वाईट हेतू रोखण्यासाठी आयोगाने यासंदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत. यासंदर्भात गेल्या महिन्यात २८ ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर जिम, कापड दुकाने व कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविणे व शाळेच्या बसेसमध्ये सुरक्षेसाठी महिलेची नियुक्ती करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला. आयोगाने मार्गदर्शक सूचनांसंदर्भात सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्रे पाठविली आहेत.
शिंपी पुरुष असेल तर आक्षेप नाही परंतु माप महिलेनेच घ्यायला हवे. महिलांची जिम व योग केंद्रात प्रशिक्षकपदी महिलाच असावी. अशा संस्थांमध्ये सीसीटीव्ही व डीव्हीआर सुरूच ठेवावे. महिलांचे कपडे विकणाऱ्या दुकानात महिलाच असावी.- बबिता चौहान, अध्यक्षा, उत्तर प्रदेश महिला आयोग