ताज्या बातम्या

Malad Road: मुलाला वाचवण्यासाठी आई बनली ढाल! तरी जमावाची युवकाला निपचित पडेपर्यंत मारहाण

Published by : Team Lokshahi

मालाडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. कार शोरूममधून पती-पत्नी घरी जात असताना ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षा चालक आणि जमावांकडून तरुणाला निपचित पडेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मालाड पूर्व येथे १३ ऑक्टोबर रोजी मनसे कार्यकर्ता आकाश माईन यांच्यासोबत घडली आहे, तर या घटनेत आकाश माईनला जीव गमवावा लागला आहे. 28 वर्षीय हैदराबादमधील आकाश माईन आणि त्याची पत्नी अनुश्री माईन हे कार शोरूममधून त्यांच्या घरी परत होते. आकाश माईनने नवीन कार बुक केली होती ती कार दसऱ्याला म्हणजेच 12 ऑक्टोबरला डिलिव्हरी घेण्यास आकाश माईन जाणार होता.

मात्र तो १३ ऑक्टोबरला कार शोरूममधून त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत असताना मालाड पूर्व शिवाजी चौक येथे एका रिक्षा चालकासोबत त्याची बाचाबाची झाली. रिक्षा चालकाने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक केल्यामुळे आकाश आणि त्या रिक्षाचालकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि हळुहळु याचे रुपांतर हाणामारीत झाले. ऑटोचालकाने त्याच्या सहकाऱ्यांना बोलावले त्या १० ते १५ जणांनी आकाशवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला त्यात आकाश गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आकाश माईनचा मृत्यू झाला. आकाशला वाचवण्यासाठी त्याची आई त्याच्या अंगावर पडलेली दिसत असून त्याला मारहाणीपासून वाचवताना दिसत होती.

आकाश माईन एका टेक कंपनीत कामाला होता आणि सात महिन्यांपूर्वीच त्याने लग्न केले होते, तर आकाश माईन हा मनसेचा कार्यकर्ता होता. यापार्श्वभूमीवर आकाश माईनची आई म्हणाली की, माझ्या सुनेने मला वादाची माहिती देण्यासाठी फोन केला, त्यावेळी त्याचे आई-वडिल दोघे ही दुसऱ्या रिक्षामधून भांडण सोडवण्यासाठी धावले आणि हे भांडण सोडवण्यासाठी त्याची आई त्याच्यावर ढाल बनून पडली मात्र तरी देखील आरोपींनी मारहाण करण थांबवल नाही.

याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान ज्या रिक्षाचालकाने हे भांडण केले त्याचे नाव अविनाश नामदेव कदम असं आहे तर त्याच्या सहकाऱ्यांच नाव अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दिपक आमटे, राकेश मलकु ढवळे, साहिल सिकंदर कदम हे असून यांना आता अटक केली आहे. तर अविनाश कदम विरोधात यापूर्वी पंतनगर व बोरीवली पोलीस ठाण्यात मारामारी व अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Omar Abdullah जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

7 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Hair Tip: दररोज केस धुताय? मग सतत केस धुणे टाळा; जाणून घ्या कारणे...

Yek Number Review: राज ठाकरेंचा चित्रपट म्हणजे 'येक नंबर'च, कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

India Vs Canada | बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले,"भारताचे गुप्तहेर..." #bishnoi