माधवी गायकवाड, मिरा-भाईंदर, मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं. यातच मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे.
मीरा- भाईंदर येथे भाईंदर रेल्वे स्थानक (पुर्व), तिकीट खिडकी समोरील इमारतीचा भाग पडला. भाईंदर पूर्व येथील नव कीर्ती इस्टेट. रुपेश बार. या बिल्डिंगचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. ही बिल्डिंग भाईंदर स्टेशन पूर्व ला लागूनच आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने धोकादायक बिल्डिंग म्हणून नोटीस दिली होती.