उद्योगपती मुकेश अंबानी यांना येणाऱ्या धमकीच्या मेलचं सत्र सुरूच आहे. आणखीन दोन मेलची त्यात भर पडली आहे. हा मेल बेल्जियम या देशातून येत असल्याचे समोर आले आहे. धमकी गांभीर्याने घेत नसल्याने आता परिणामांसाठी तयार रहा असा पुन्हा इशारा देण्यात आला आहे.
याता धमकीत 400 कोटींची खंडणी मागण्यात आली. अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी धमकीचा पहिला मेल आला होता. गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.