Gotabaya Rajpaksa Team Lokshahi
ताज्या बातम्या

देश सोडून जाऊ नका; श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महिंदा राजपक्षेंना थांबवलं

श्रीलंकेच्या अध्यक्षपदावर असताना गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर न्यायालयाने आता कारवाईला सुरुवात केली आहे.

Published by : Sudhir Kakde

श्रीलंकेच्या अध्यक्षपदावर असताना गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajpaksa) यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर न्यायालयाने आता कारवाईला सुरुवात केली आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे देश सोडून जाऊ शकत नाहीत, असा आदेश न्यायालयाने जारी केला आहे. बेसिल राजपक्षे यांनी महिंदा राजपक्षे यांच्याप्रमाणे विमानतळावरून देशाबाहेर पळण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवाशांच्या गोंधळामुळे त्यांना विमानतळ सोडावं लागलं. काही काळापासून महिंदा राजपक्षे कुठे आहेत, असा प्रश्नही उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लोकेशनबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा झाल्याच्या दिवशी न्यायालयाचा आदेश आला आहे. श्रीलंकेचे सभापती महिंदा अभयवर्धने यांनी पत्रकारांना सांगितलं की, राजपक्षे यांनी सिंगापूरहून त्यांना राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. अनेक महिन्यांच्या विरोधानंतर राजपक्षे यांचा राजीनामा आला आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचं चुकीचं व्यवस्थापन केलं असं टीकाकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे श्रीलंकेतील 22 दशलक्ष लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, 2019 पासून देशाचे प्रमुख, तसंच 22 दशलक्ष लोकसंख्येच्या देशातील राजकारणावर वर्षानुवर्ष वर्चस्व गाजवणाऱ्या राजपक्षे कुळातील फक्त एक सदस्य आहेत. 76 वर्षीय भाऊ महिंदा हे 2015 पर्यंत एका दशकासाठी राष्ट्रपती होते. 2009 मध्ये श्रीलंकेच्या दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धाचा रक्तरंजित शेवट त्यांनी पाहिला आहे. महिंदांच्या नेतृत्वाखाली, श्रीलंका चीनच्या जवळ गेला आणि चीनला क्रिकेट स्टेडियम आणि विमानतळ तसेच समुद्रातील बंदरं भाड्यानं देऊन व्हॅनिटी प्रकल्पांसाठी अब्जावधी डॉलर्सचं कर्ज घेतलं.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha